मुंबई : अनेक मालिका आणि जवळजवळ २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. सतीश शाह दिवसांपासून किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते.
२५ जून १९५१ रोजी मुंबईत जन्मलेले सतीश शाह हे एका गुजराती कुटुंबातून आहेत. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि नंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले होते. त्यांनी १९७८ ला ‘अजीब दास्तान’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यांनी “साराभाई विरुद्ध साराभाई”, “जाने भी दो यारो” आणि “मैं हूं ना” या चित्रपटांमधील भूमिकांसाठी जास्त लोकप्रियता मिळवली होती.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx