अलिबाग : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत सरपंचपदांसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी (दि.२२) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती एक, अनुसूचित जमाती ११, नागरिकांचा मागास प्रवर्ग १७, सर्वसाधारण ३३ सरपंचपदाची सोडत काढण्यात आली आहे. ६२ पैकी ३१ ग्रामपंचायतमधील सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच विक्रम पाटील, सर्व पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य यांच्या उपस्थितीत आरक्षण पदाची सोडत काढण्यात आली.
सरपंच पदाचे आरक्षण
• अनुसूचित जाती (महिला) : आंबेपूर.
• अनुसूचित जमाती (खुला) : पेझारी, झिराड, नागाव, माणकुले, शहापूर.
• अनुसूचित जमाती (महिला) : आवास, ढवर, चिंचोटी, काविर, पेढांबे, वैजाळी.
• नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला) : वाघोडे, धोकवडे, शिरवली, आगरसुरे, कुरकुंडी कोलटेंभी, सहाण, चिंचवली, मिळकतखार, बेलोशी.
• नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : नवगाव, रेवदंडा, किहीम, परहुर, वाडगाव, रांजणखार डावली, शहाबाज, खंडाळे.
• सर्वसाधारण (खुला) : कोप्रोली, सातीर्जे, कुरुळ, चौल, श्रीगाव, खिडकी, बोरीस, बोरघर, वरसोली, चरी, वरंडे, थळ, मुळे, सुडकोळी, खानाव, सारळ, पोयनाड.
• सर्वसाधारण (महिला) : कामार्ले, रामराज, वेश्वी, कुसुंबले, रेवस, आक्षी, माणगाव, कुर्डुस, वाघ्रण, झिराड, नारंगी, बेलकडे, ताडवागले, चेंढरे, बामणगाव, सासवणे.
आरक्षण सोडती दरम्यान गोंधळ
अलिबाग तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी २ वर्षांपूर्वी आरक्षण सोडत काढण्यात आले होते. मात्रंगळवारी पुन्हा एकदा या ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत काढण्यात येत असल्याने सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपला आक्षेप नोंदविला. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे काही काळ बैठक तहकूब करण्यात आली. यांनतर आपले आक्षेप वरिष्ठ स्तरावर कळविण्यात येतील असे आश्वासन उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिले. यांनतर आरक्षण सोडत काढण्यात आले.

© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx