Wednesday, October 29, 2025
अवैध दारू विक्रीविरोधात मांडवा पोलिसांची कारवाई
अवैध दारू विक्रीविरोधात मांडवा पोलिसांची कारवाई...

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील मांडवा दस्तुरी फाटा येथे विक्रीसाठी आणलेल्या अवैध दारू साठ्याविरोधात मांडवा सागरी पोलिसांनी बुधवारी (दि.१३) धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १७ हजार १८० रुपये किंमतीच्या ९२१ बाटल्या जप्त केल्या आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली.

मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाणी व पोलीस शिपाई पाटील यांच्यासह पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना खाणाऱ्यामार्फत दस्तुरी नाका येथे प्रकाश प्रेमनाथ जयस्वाल (३३, रा. दस्तुरी फाटा, मांडवा, मूळ रा. पटना, बिहार) हा संदिप बिअर शॉपीच्या मागे देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी जयस्वाल याला ताब्यात घेत 

त्याच्या ताब्यातील पत्र्याच्या शेडमध्ये तपास केला असता, मॅकडॉल नंबर १ ओरीजनल, रॉयल ग्रीन व्हिस्की, डीलक्स ब्लॅक व्हिस्की, ओकस्मिथ गोल्ड, ब्लॅक अँड व्हाईट, अॅबसॉल्ट व्होडका, चिवास रिगल यांसह विविध ब्रँडच्या ९२१ दारूच्या बाटल्या सापडल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या अधिपत्याखाली व पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx