देश महाराष्ट्र
अलिबाग : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष राजेन्द्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विधी स्वयंसेवकांसाठी रिफ्रेशर ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील गरजू वंचित लोकांना मदत करण्यासाठी विधी स्वयं से वकांनी काय देविषयक ज्ञान घेऊन त्यांना योग्य ती मदत करणे गरजेचे आहे हा यामागचा उद्देश होता. प्रशिक्षण कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले विधी स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सृष्टी नीलकंठ, जिल्हा न्यायाधीश–1, रायगड यांनी भूषवून उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, मनोगत व प्रशिक्षणाबाबतचे मार्गदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी केले.
या प्रशिक्षण सत्रात माननीय ॲड. मनीषा नागावकर, ॲड. उषा पाटील, ॲड. हिना तांडेल, ॲड. तनुष्का पेडणेकर आदी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी कायद्याच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करून विधी स्वयंसेवकांना अद्ययावत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पनवेल येथील विधी स्वयंसेवक शैलेश कोंडसकर यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी अलिबाग येथील विधी स्वयंसेवक पुनम रांजणकर यांनी आभार प्रदर्शन केले. अध्यक्षांच्या परवानगीने हा रिफ्रेशर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx