अलिबाग : टीसीपीएल फाऊंडेशन, दि मदर तेरेसा मेमोरियल सोशल वेल्फेअर ट्रस्ट आणि झिराड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (दि.८) महिला दिनानिमित्त झिराड
गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आरोग्य शिबिरामध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, नेत्र चिकिस्ता, सामान्य आरोग्य तपासणी यासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली तसेच रुग्णांना आवश्यक ते औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेण्याची संधी मिळाली. शिबिराचा गावातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांच्या उपस्थितीत टीसीपीएल फाऊंडेशनचे साकिब कनोरिया, काहिनी कनोरिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झिराड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच दर्शना भोईर, ग्रामविकास अधिकारी संजय पाटील उपस्थित होते.
एका वर्षापूर्वी आम्ही झिराड गावात फार्महाऊस बांधले आहे. आमची गावातील नागरिकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यादृष्टीने दिलीप भोईर यांच्या सहाय्याने आम्ही आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. यापुढेही असे शिबिर आयोजित करण्यात येतील. तसेच येथील रुग्णालयाला मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
: साकिब कनोरिया
टीसीपीएल फाऊंडेशन.
झिराड गावात टीसीपीएल फाऊंडेशन, दि मदर तेरेसा मेमोरियल सोशल वेल्फेअर ट्रस्ट आणि झिराड ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक ते औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. यापुढेही अशी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतील.
: दिलीप भोईर
सदस्य, रायगड जिल्हा परिषद.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx