Saturday, December 27, 2025
ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली ; चार जणांचा मृत्यू
ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली ; चार जणांचा मृत्यू...

माणगाव : पुणे माणगाव मार्गावर असलेल्या ताम्हिणी घाटात थार कार ५०० फूट दरीत कोसळल्याची‌ घटना घडली आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अवघड वळणावर चालकाचा नियत्रंण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कार मधील प्रवासी दोन दिवसापूर्वी कोकणात फिरायला निघाले होते. मागील दोन दिवस ते संपर्कांच्या बाहेर असल्याने त्यांचे घरचे चिंतेत होते. कोणत्याही परिस्थितीत संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी चौकशी सुरू केली. मोबाईलमधील शेवटचे लोकेशन तपासण्यात आले असता ताम्हिणी घाट परिसरातच जीपीएस सिग्नल थांबल्याचे दिसले. यानंतर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमकडून आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेण्यात आली. अखेर ड्रोन शुटमध्ये दरीत थार जिप आणि मृतदेह आढळले. सध्या या मृतदेहाच्या तपासणीचे काम सुरु आहे. माणगाव पोलीस घटनास्थळी पोहचले असून रेस्क्यू टीमच्या सहकार्याने मदत कार्य सुरू आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx