Saturday, December 27, 2025
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पंत करणार भारताचे नेतृत्व
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पंत करणार भारताचे नेतृत्व...

ऑनलाइन डेस्क : भारताचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून दुखापतीमुळे बाहेर पडला असून, tuqchyajagi यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. ऋषभ पंत भारताचा ३८ वा कसोटी कर्णधार बनेल.

पंतने शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की गिलच्या बदलीचा निर्णय जवळजवळ अंतिम झाला आहे आणि शनिवारी अधिकृत घोषणा केली जाईल. पंत म्हणाला, मला गुरुवारी कळले की मी कर्णधारपद भूषवणार आहे. शुभमनची प्रकृती सुधारत आहे. तो खेळू इच्छित होता, परंतु त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते. त्यांनी गिलच्या भावनेचे कौतुक करताना म्हटले की, कर्णधार म्हणून तुम्हाला असा संघनेता हवा असतो ज्याच्याकडे कठीण परिस्थितीतही संघासाठी खेळण्याची आवड असेल. गिलने ते दाखवून दिले आणि ते संघाला प्रेरणा देते. २६ वर्षीय गिल संघाबाहेर असल्याने, ऋषभ पंत भारताचा ३८ वा कसोटी कर्णधार बनेल.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx