पनवेल : लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली. यावेळी ‘दिबां’च्या नावासाठी पाठपुरावा सुरूच ठेवण्याचे सर्वानुमते ठरले. या संदर्भात कृती समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
या बैठकीस कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, सल्लागार जगन्नाथ पाटील, जे.एम. म्हात्रे, सरचिटणीस दीपक म्हात्रे, सहचिटणीस संतोष केणे, राजेश गायकर, खजिनदार जे.डी. तांडेल, सदस्य ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, दशरथ भगत, रूपेश धुमाळ, अॅड. भारद्वाज चौधरी, सुरेश पाटील, राजाराम पाटील, विजय गायकर यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी राज्य सरकारने ठराव मंजूर करून केंद्र सरकारला पाठवलेला आहे. याबाबत केंद्रातील मोदी सरकारही अनुकूल असल्याचे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते. याच अनुषंगाने पुढे पाठपुरावा करण्याचे वाशी येथील बैठकीत ठरले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx