देश महाराष्ट्र
अलिबाग, : श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला समुद्रकिनारी ग्रीन सी टर्टल (Green Sea Turtle) या प्रजातीचे नर जातीचे कासव आढळून आले आहे. अंदाजे अंदाजे 200 किलो वजनाचे हे ग्रीन सीटर्टल कासव असून, त्याची लांबी ६ फूट ३ इंच आहे. सदर कासवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात समुद्रात सोडण्यात आले आहे.
बागमांडला येथे फेरीबोटीच्या नवीन जेट्टीच्या एका बाजूला चिखलांवर एक मोठं कासव वाहून आले असल्याची माहिती आकाश सुरेश पाडलेकर यांनी वनविभागाच्या दक्षिण कोकण विभाग कांदळवन कक्ष कार्यालयासोबत संपर्क साधित दिली. यानंतर कांदळवन वनरक्षक, कासव तज्ञ, कासव मित्र यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता सदर कासव हे ग्रीन सी टर्टल या प्रजातीचे नर कासव असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
रायगड जिल्ह्यात सागरी क्षेत्रात सागरी कासवांच्या पाच प्रजाती आढळतात त्या अनुषंगाने या प्रजातीचा त्यात समावेश आहे. बागमांडला येथे प्रथमच नर ग्रीन सी कासव वाहून आल्याचे कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांच्या निदर्शनास आले. अंदाजे २०० किलो वजनाचे हे ग्रीन सीटर्टल कासव असून, त्याची लांबी ६ फूट ३ इंच इतकी आहे. पाण्याला ओहोटी लागल्यामुळे ते किनाऱ्यावर वाहून आले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मारळ येथील जयंत कानडे, संकेत मयेकर व हरिहरेश्वर येथील संतोष मयेकर, सुबोध खोपटकर कासव मित्र आणि कांदळवन विभागाचे वनरक्षक तुषार भटे व ऋषिकेश लव्हटे, कासव तज्ञ मोहन उपाध्ये, स्थानिक ग्रामस्थ आणि फेरी बोटीवर काम करणाऱ्या मुलांच्या साहाय्याने त्यासदर कासवाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx