ऑनलाईन डेस्क : बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी आज शपथ घेतली. पाटणाच्या ऐतिहासिक गांधी मैदानात पार पडलेल्या या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. भाजपच्या कोट्यातून सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
नुकत्याच संपलेल्या बिहार विधानसभा निडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षासह एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं. त्यानुसार, एनडीए आघाडीला तब्बल २०२ जागांवर विजय मिळाला. दुसरीकडे विरोधी पक्षांना अवघ्या ३५ जागांवर समाधान मानावं लागलं. याशिवाय, एमआयएमला ५ जागांवर तर बसपाला एका जागेवर विजय मिळाला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा एनडीएचं आणि त्यातही नितीश कुमार यांच्याच नेतृत्वातलं सरकार स्थापन झाले आहे.
आज बिहारच्या एकूण २६ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये भाजपाला सर्वाधिक १४ मंत्रीपदं देण्यात आली असून जवळपास बरोबरीच्या जागा जिंकणाऱ्या जदयूला ८ मंत्रीपदं देण्यात आली आहेत. याशिवाय इतर मित्रपक्षांना ४ मंत्रीपदं देण्यात आली आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx