अलिबाग : भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड विभागातील बारा मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती, भाजपा रायगड लोकसभा मतदारसंघ प्रमुख सतीश धारप यांनी रविवारी (दि.२०) अलिबाग येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
रायगड लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील ११ तालुके आहेत. भाजपने या तालुक्यात १७ मंडल तयार करण्यात आले आहेत. १७ पैकी १२ मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. जो कार्यक्षम आहे त्याला संधी देण्यात आली आहे. उर्वरित ५ मंडल अध्यक्षांची नियुक्ती येत्या आठ दिवसांत करण्यात येईल, अशी माहिती सतीश धारप यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार नुकत्याच पार पडणाऱ्या संघटन पर्व अंतर्गत खालील मंडल अध्यक्षांची निवड झाली. दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी २० एप्रिल रोजी ही नावे जाहीर केली, असे धारप यांनी सांगितले. यावेळी भाजपा नेते गिरीश तुळपुळे, जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सोपान जांबेकर, सुनील दामले उपस्थित होते.
नवनियुक्त मंडळ अध्यक्ष
नीलेश तळवटकर (महाड दक्षिण), नीलेश देवगिरकर (महाड उत्तर), युवराज मुंढे (निजामपूर), शैलेश काते (मुरुड), महेश पाटील (म्हसळा), रितेश रवींद्र मुंडे (तळा), परेश सांगळे (माणगाव), अमित घाग (रोहा), संजय डंगर (पेण), श्रीकांत ठोंबरे (सुधागड), विजय भानुदास पाटील (हमरापूर), महेश ठाकूर (नागोठणे)
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx