ऑनलाइन डेस्क : साताऱ्यामधील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणत पोलीसांनी कारवाई करीत प्रशांत बनकर याला अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील आणखी एक आरोपी सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ बदने हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
डॉक्टर महिलेने मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहीली होती. सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ बदने याने आपल्यावर ४ वेळा अत्याचार केल्याचं तिने नोटमध्ये लिहीलं होतं. तर प्रशांत बनकर याने आपला मानसिक व शारीरीक छळ केल्याचा आरोप करत त्या तरूणीने आयुष्य संपवलं होतं. या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली होती.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx