देश महाराष्ट्र
नाशिक : शिवसेनेत (शिंदे गट) असणाऱ्या माजी आमदार निर्मला गावित यांना कारने धडक दिल्याची घटना घडला आहे. आपल्या नातवाला घराबाहेर फिरवत असताना मागून आलेल्या एका चारचाकीनं त्यांना जोरदार धडक दिली. गावित यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
माजी आमदार नीला गावित या घराबाहेर नातूला फिरवत होत्या. रस्त्याच्या कडेनं गावित चालत होत्या. यावेळी गावित यांना मागून कारने जोरदार धडक दिली. या धडकेत निर्मला गावित गंभीररित्या जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गावित यांना नाशिकमधील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी गावित कुटुंबियांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx