देश महाराष्ट्र
अलिबाग : रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघ मर्यादित, अलिबाग यांच्यावतीने लोणावळा येथील बॅसिलिका हॉटेल येथे “Unshakeable Recovery” या विषयावर दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण शिबिरासाठी कार्पोरेट को-ऑपरेटिव्ह कन्सल्टंट, कोच, ट्रेनर व लेखक संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा महासंघाच्या १५ सभासद पतसंस्थांचे एकूण ५८ प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,संचालक , अधिकारी व कर्मचारीवर्गाचा समावेश असून अलिबाग मुरुड, उरण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव व महाड तालुक्यातून प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान वसुली व्यवस्थापन आर्थिक शिस्त संस्थात्मक स्थैर्य आणि सहकारातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महासंघाचे सचिव शयोगेश मगर, महासंघ संचालक मंडळ व कर्मचारी यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणार्थींनी शिबिराबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा प्रकारचे उपयुक्त प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx