अलिबाग : रायगडच्या सायबर सेल पोलिस विभागाने उल्लेखनीय कामगिरी बजावित चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले २४ मोबाईलचा छडा लावीत ते मूळ मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत ३ लाख ४७ हजार ५०० रुपये इतकी आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक कार्यालयात मूळ मालकांना हे मोबाईल परत करण्यात आले.
सायबर पोलिसांनी चोरीला गेलेले व गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी CEIR पोर्टल (Central Equipment Identity Register) चा वापर केला. या तांत्रिक कामगिरीत महिला पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल जाधव, तसेच पोलिस कॉन्स्टेबल श्रेयस शशिकांत गुरव, सहाय्यक फौजदार अजय मोहिते, म.पो.ह. सुषिता पाटील, पोहवा राजीव झिंजुर्टे, पोना तुषार घरत, पोना समीर पाटील, पोना राहुल पाटीलआणि सहकाऱ्यांनी भूमिका बजावली.
दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मोबाईल चोरी किंवा हरवल्यास त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार करावी किंवा CEIR पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी, ज्यामुळे मोबाईल परत मिळण्याची शक्यता वाढत असल्याचे पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे.
सायबर पोलिसांनी चोरीला गेलेले व गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी CEIR पोर्टल (Central Equipment Identity Register) चा वापर करीत मोठी कामगिरी बजावली आहे. १ जानेवारीपासून आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत चोरीला गेलेले किंवा गहाळ झालेले असे एकूण ९४४ मोबाईल फोन परत मिळवून मूळ मालकांना परत केले आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx