मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा निर्धार मेळावा सोमवार (दि.२७) पार पडणार आहे. सदर मेळावा वरळी एनएससीआय डोममध्ये सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विभागप्रमुख, शाखाप्रमुख ते उपशाखाप्रमुखांपर्यंत सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या नियोजनाबाबत मुंबईतील विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुख मार्गदर्शन करतील. त्यामुळे या मेळाव्याकडे राजकीय विश्वाचेही लक्ष लागले आहे. संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याच्या टीझरला सध्या प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx