मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अधिकृत प्रवक्ते जाहीर केले आहे. संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. याव्यतिरिक्त पक्षाचे नेते ॲड. अनिल परब, उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी, उपनेत्या सुषमा अंधारे, जनसंपर्क प्रमुख ॲड. हर्षल प्रधान, आनंद दुबे, जयश्री शेळके या सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यात आले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली, यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडत असतात, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx