Saturday, December 27, 2025
सायबर गुन्हेगारांवर पोलिसांनी मिळविला अंकुश
सायबर गुन्हेगारांवर पोलिसांनी मिळविला अंकुश...

अलिबाग : रायगड पोलिसांनी सायबर गुन्हेगारांवर अंकुश मिळविण्यात यश मिळविले आहे. रायगड जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात सायबर क्राईमच्या माध्यमातून आर्थिक फसवणूकीचे ८ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सायबर गुन्हेगारांनी २ कोटी २७ लाख ८२ हजार ६०९ रुपयांचा डल्ला मार्क होता. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली असून, २ कोटी ६२ हजार ९१२ रूपये जप्त केले आहेत. 

वाढते नागरिकरण तसेच आधुनिक जीवनशैली यामुळे जिल्ह्यात सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. इंटरनेट तसेच मोबाईलची वाढती संख्या यामुळे सायबर क्राईम वाढत असल्याचे दिसून येते. सायबर क्राईमचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात सायबर सेल स्थापन करण्यात आला आहे. तसेच सायबर क्राईमसंबंधी वाढते गुन्हे लक्षात घेऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांसंबंधी तपास करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. 

मागील १२ महिन्यात सायबर क्राइम माध्यमातून हसवणुकीचा ८ गुन्‍हे दाखल झाले आहेत. यामध्ये त्‍यातील २ कोटी २७ लाख ८२ हजार ६०८ रुपयांची फसवणूक करण्यात आले आहे. यामधील २ कोटी ६२ हजार ९१२ रूपये आरोपींकडून पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्‍यात आली आहे. मात्र डिजीटल आर्थिक गुन्‍हयात वसूल केलेली रक्‍कम बँकांमध्‍ये जमा होते ती रक्‍कम न्‍यायायलाच्‍या आदेशाने संबंधित व्‍यक्‍तीला परत केली जाते. परंतु अनेकदा कोर्टाची ऑर्डर यायला उशीर होत असल्‍याने संबंधिताला फसवणूकीची रक्‍कम मिळायला उशीर होत असल्‍याचे निदर्शनास आले आहे.


सायबर गुन्हेगारीचे प्रकार

* सोशल साईट्सच्या माध्यमातून तरुण, तरुणींना ब्लॅकमेल करणं

* नोकरीविषयक साईट्सवरुन नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक करणं

* विवाहविषयक साईट्सवर नोंदणी करणाऱ्या महिलांची आर्थिक फसवणूक

* ई-मेलवर माहिती मागवून त्यांची आर्थिक फसवणूक करणे

* बँकेतून फोन केल्याची बतावणी करत खात्याची सर्व माहिती घेऊन त्याआधारे फसवणूक


लोकांचे दुर्लक्ष सायबर गुन्हे वाढण्यास कारणीभूत

अनोळखी माणसांना आपल्या एटीएमचा नंबर देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी अनेकदा केले आहे. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून हे आवाहन करताना तसे संदेशही अनेकदा मोबाईलवरून देण्यात आले आहेत. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून नागरिक आपला नंबर अनोळखी लोकांकडे देत आहेत. कुठल्याही बँकेचा मॅनेजर फोनवरून एटीएम नंबर विचारत नाही आणि तो विचारूही शकत नाही. याबाबत वारंवार बँकांकडून जागृती केली जाते. तरीही ग्राहक या फसवेगिरीला फसतो आणि दृष्टचक्रात अडकतो. तसेच सोशल नेटवर्किंग साईटवर आपली संपूर्ण माहिती टाकू नका. अनोलखी माणसासोबत चॅटींग करताना त्याला आपले फोटो तसेच वैयक्तिक माहिती देऊ नका असे आवाहनही पोलीस करतात, मात्र याकडेही नागरिक दुर्लक्ष करतात, यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावत आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx