पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देशभरातील १३२ शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे.
सीबीएसईनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे परीक्षेची माहिती दिली.राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्य स्तरावरील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित केली जाते, तर राष्ट्रीय पातळीवर सीबीएसईतर्फे सीटीईटी ही परीक्षा घेण्यात येते. सीबीएसईतर्फे वर्षातून दोनवेळा परीक्षेचे आयोजन केले जाते. उमेदवारांना शिक्षक होण्यासाठीची पात्रता प्राप्त करण्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी यातील कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होता येते. सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सीटीईटीमध्ये पेपर १ आणि पेपर २ चा समावेश असणार आहे. एकूण २० भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी https://ctet.nic.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx