ऑनलाईन डेस्क : सौदी अरबमध्ये भारतीय प्रवाशांना घेऊन मक्काहून मदिनाला जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात सुमारे ४३ भारतीय हज यात्रेकरुंचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त होत आहे. मुफ्रीहाट स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. बस व डिझेल टँकरच्या धडकेमुळे टँकरमधील डिझेल पेटलं आणि हा अपघात घडला आहे.
बसचा चालक या भीषण अपघातातून बचावला असून त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत. मृत भारतीय प्रवाशांपैकी अनेक जण हे तेलंगणामधील हैदराबाद शहरातील रहिवासी होते. टँकरमध्ये डिझेल असल्यामुळे अपघातानंतर टँकर व बसने पेट घेतला. ज्यामध्ये अनेक प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या अपघातात काही प्रवासी होरपळले आहेत. त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार चालू आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx