मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने शासन निर्णय काढत याबाबतची घोषणा केली आहे.
तसेच आमदार आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, शिशिर शिंदे व पराग आळवणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx