मुंबई : अरबी समुद्रात पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याचे समोर आले आहे. या नवीन सापडलेल्या खनिज तेलाच्या साठ्यामुळे भारतीय तेल उत्पादनात सक्षम होण्याची नवी आशा आता निर्माण झाली आहे.
नवीन तेल साठे पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील तसेच सिंधुदुर्गातील मालवणजवळील समुद्रात आहेत. केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात ५ हजार ३३८ आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात १३ हजार १३१ चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत.
कोकणातील डहाणू आणि मालवण या ठिकाणी तेल विहिरींचे उत्खनन सुरू होईल, जे स्थानिक उद्योगांना चालना देतील आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे. अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे की, हे नवे तेल साठे भारताला तेल उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx