अलिबाग : अलिबाग तालुक्यातील झिराड येथील साई क्रीडा मंडळाच्या वतीने गोविंदा पथकांसाठी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या माध्यमातून या सराव शिबिरे अलिबाग विधानसभा क्षेत्रातील पथकांना आमंत्रित करण्यात आले होते. महिला आणि पुरुषांचे अशी ५६ गोविंदा पथके यात सहभागी झाली होती. पुरुष गटात गावदेवी गोविंदा पथक गोंधळपाडा तर महिला गटात जय हनुमान महिला गोविंदा पथक भोनंग पथकाने विजेतेपद पटकाविले. सराव शिबिराचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते दिलीप भोईर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
१६ ऑगस्ट रोजी गोपाळकाला असून, गोविंदा पथके मानवी मनोरे रचित दही हंडी फोडण्याचा नियमित सराव करीत आहेत. ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या माध्यमातून साई क्रीडा मंडळाच्या वतीने गोविंदा पथकांसाठी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सराव शिबिरात पुरुष गोविंदा पथकानी ५ थरांची तर महिला गोविंदा पथकांनी चार थरांची सलामी दिल्यास त्यांना रोख पारितोषिक ठेवण्यात आले होते. सराव शिबिरात पुरुष गटात गावदेवी गोविंदा पथक गोंधळपाडा गोविंदा पथकाने प्रथम तर जय भवानी गोविदा पथक खारगाव द्वितीय, जय हनुमान गोविदा पथक भोनग तृतीय क्रमांक पटकाविला तर महिला गटात जय हनुमान महिला गोंविदा पथक भोनंग प्रथम, जय भवानी महिला गोंविदा पथक वरसोली द्वितीय, पाच नाका महिला गोंविदा पथक अलिबाग तृतीय क्रमांक पटकाविला.
सराव शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजा केणी, तालुकाप्रमुख अनंत गोंधळी यांच्यासह अलिबाग, रोहा, मुरुड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx