Wednesday, February 25, 2026
अलिबाग तालुक्यातील मुशेत येथे दरोडा
अलिबाग तालुक्यातील मुशेत येथे दरोडा...

देश महाराष्ट्र

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील मापगांव परिसरातील मुशेत गावानजीक असणाऱ्या कुणाल पात्रे यांच्या बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. कुकुट खाद्य बनवणाऱ्या कुकूचकू कंपनीचे मालक असणाऱ्या पात्रे कुटुंबियांवर दरोडेखोरांनी रात्री दहशत माजवली होती. हत्यारबंद असणाऱ्या दरोडेखोरांनी झोपेत असलेल्या पात्रे कुटुंबियांना उठवून मारहाण करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच घरातील मोबाईल फोन असा सुमारे १७ लाख रुपयांचा ऐवज लुटीत पोबारा केला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या सहकार्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दरोड्याचा समांतर तपास सुरू केला आहे.

मुशेत गावाच्या हद्दीत कुकूचकू कंपनीचे मालक कुणाल पात्रे यांचा बंगला आहे. शनिवारी (दि.3) मध्यरात्रीच्या सुमारास कुणाल पात्रे यांच्या बंगल्यामध्ये ८ ते ९ दरोडेखोर घुसले. चारचाकी घेऊन आलेल्या या दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईलने पात्रे कुटुंबियांना शास्त्रांच्या धकासमोर दहशतीमध्ये बसवले. घरात असणारे पैसे आणि दागिने आणण्यास सांगितले. तसेच, तिजोरी दाखविण्यासाठी सर्व कुटुंबियांना मारहाण केली. यावेळी घरात असणाऱ्या कुटुंबियांवर ज्वलनशील द्रवपदार्थ टाकून त्यांना जाळण्याची धमकी देखील दरोडेखोरांनी दिली. पात्रे यांच्या एका मुलाला शेतात नेऊन मारहाण देखील या दरोडेखोरांनी केल्याचे समजते. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या सहकार्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दरोड्याचा समांतर तपास सुरू केला आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx