Saturday, December 27, 2025
अलिबाग नगरपरिषद निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे गट) युतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल
अलिबाग नगरपरिषद निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे गट) युतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल...

अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना (शिंदे गट) युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सोमवारी (दि.१७) उमेदवारी अर्ज दाखल केले. युतीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या तनुजा पेरेकर यांनी अर्ज दाखल केला. 

सोमवारी भाजप व शिवसेना (शिंदे गट) युतीचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने सकाळपासून अलिबाग येथील भाजप कार्यालयात कार्यकर्ते तसेच उमेदवार दाखल होऊ लागले होते. भाजपचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, भाजपचे नेते सतीश धारप  हे भाजप कार्यालयात आल्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवार अर्ज भरण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेत दाखल झाले. यांनतर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पाटील यांच्याकडे उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. अस्वाद पाटील, भाजप महिला आघाडी जिल्हा संघटिका चित्रा पाटील, भाजप जिल्हा चिटणीस ॲड. महेश मोहिते, भाजप अलिबाग शहराध्यक्ष ॲड. अंकित बंगेरा यांच्यासह भाजप व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


जनतेला बदल हवा आहे. यामुळे भाजप, शिवसेना युतीच्या उमेदवारांना त्यांचा पाठिंबा मिळत आहे. अलिबाग नगरपरिषदेत मागील काही वर्ष विरोधकांची सत्ता आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात येथे विकास झालेला नाही. येथे विकासाची गंगा आणण्यासाठी जनता युतीच्या पाठी उभी राहून, युतीच्या उमेदवारांना विजयी करेल.

: विक्रांत पाटील

आमदार


समन्वयाने आम्ही अलिबाग नगरपरिषदेत जागा वाटप केले आहे. भाजपची शहरातील ताकद पाहता त्यांच्याकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. तनुजा पेरेकर यांनी युतीतर्फे नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला आहे. मी नगरपरिषदेच्या विकासासाठी मोठा निधी आणला आहे. यामुळे नगरपरिषदेत निश्चित परिवर्तन होईल.

: महेंद्र दळवी 

आमदार

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx