अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मध्ये शेकाप, काँग्रेस आघाडी व भाजप, शिवसेना (शिंदे गट) युतीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दंड थोपटले असून, शिवसेना शहर प्रमुख संदीप पालकर व श्वेता पालकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी (दि.१७) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे प्रभाग क्रमांक ४ मध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढणार असून, प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा लाभत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे मत संदीप पालकर व शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केले...
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx