अलिबाग : अलिबाग बस स्थानकात शुक्रवारी (दि.२८) सकाळी एका मनोरुग्णाने उच्छाद मांडला. मनोरुग्णाच्या हरकतींमुळे बस आगारातील वातावरण दंग झाले होते. पोलीसांनी संबंधित मनोरुग्णाला पोलीस ठाण्यात नेल्यानंतर बस आगारातील कर्मचारी व प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.
शुक्रवारी पहाटे ७ वाजण्याच्या सुमारास अलिबाग बस आगारात एक मनोरुग्ण घुसला. आगारात उभ्या असलेल्या बसच्या खाली घुसणे, बसमध्ये चढणे, आगारातून ये-जा करणाऱ्या बसच्या मध्ये येणे. यासह प्रवाशांच्या अंगावर धावून जाणे असे प्रकार मनोरुग्णाने केले. यामुळे आगारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान आगारातील कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रकार अलिबाग पोलीसांना कळविला. यांनतर अलिबाग पोलिसांनी आगारात येत, संबंधित मनोरुग्णाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मनोरुग्णाला पोलीस घेऊन गेल्यानंतर आगारातील कर्मचारी व प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx