Sunday, June 1, 2025
अलिबागच्या कुंडलिक खाडीत भरल्या शिडाच्या होड्यांच्या स्पर्धा
अलिबागच्या कुंडलिक खाडीत भरल्या शिडाच्या होड्यांच्या स्पर्धा ...

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील आग्राव येथील कुंडलिका खाडीत सोमवारी (दि.३१) शिडाच्या होड्यांची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पंकज कोळी यांच्या हिरकणी धन्या मल्हार बोटीने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत ५० हून अधिक शिडाच्या होड्या सहभागी झाल्या होत्या.


आग्राव येथील कुंडलिका खाडीत दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शिडाच्या होड्यांची स्पर्धा भरविण्यात येते. सध्या शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असून, शिडाच्या होड्यांची परंपरा जपण्यासाठी या स्पर्धा भरविण्यात येतात. सोमवारी पार पडलेल्या शिडाच्या होडी स्पर्धेत ५० हून अधिक शिडाच्या होड्या सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील यांच्यासह परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx