Sunday, June 1, 2025
आजीची एक वर्षांच्या नातवासह आत्महत्या
आजीची एक वर्षांच्या नातवासह आत्महत्या ...

रोहा : रोहा तालुक्यात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. आजीने एक वर्षांच्या नातवाला सोबत घेऊन बुधवारी (दि.९) रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास इमारतीवरून उडी मारल्याची धक्कादायक घटना रोहा इथं घडली आहे. या घटनेत आजीचा जागीच मृत्यू झाला तर नातवाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रोहा इथल्या ओम चेंबर बिल्डिंगमध्ये दोघे राहत होते. उर्मीला सिद्धाराम कोरे (५१) रा. ओम चेंबर असे उडी मारणाऱ्या महिलेचे नाव आहे. वेदांत विवेक भोगडे (१) असे असे मृत नातवाचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला कोरे या रोहा कोलाड रस्त्यावर ओम चेंबर बिल्डिंगमध्ये राहत होत्या. त्यांनी सकाळी साडे सहाच्या सुमारास इमारतीच्या टेरेसवरून नातू वेदांत विवेक बोगडे याच्यासह उडी मारली. यात उर्मिला यांचा जागीच मृत्यू झाला. तर, नातू वेदांत भोगडे याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचाराकरता रोहा शासकीय हलवण्यात आले होते. परंतु, मुलाची नाजूक परिस्थिती असल्यामुळे त्याला नवी मुंबई येथील एमजीएम या रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx