मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार (दि.३) सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
राऊत यांच्याव्यतिरिक्त आमदार योगेश सागर, संजय केळकर, बबनराव लोणीकर, रमेश बोरणारे, दिलीप बनकर, बापुसाहेब पठारे आणि अमित झनक यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड केल्याचे नार्वेकर यांनी जाहीर केले.
ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष काही महत्त्वाच्या बैठकीत किंवा कार्यक्रमात व्यस्त असतात अशा वेळी सभागृहाचे कामकाज तालिका अध्यक्ष हाताळतात. या तालिका अध्यक्षांच्या पंक्तित सुनील राऊत यांचे नाव आल्याने आमदारांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx