अलिबाग : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF), थळ युनिटमध्ये बुधवारी (दि.२६) संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला थळ युनिटमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष प्रसंगी कार्यकारी संचालक (थळ) नितीन हिरडे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा शिलालेख अनावरण करण्यात आला. कंपनीतील एससी एसटी एम्प्लॉईज वेलफेर असोसिएशनच्या पुढाकारातून हा शिलालेख स्थापित करण्यात आला आहे. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपस्थित कर्मचार्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचे काटेकोर पालन करण्याची शपथ घेतली.
तसेच यावेळी संविधानाचे महत्त्व, त्याचा इतिहास, भारतीय लोकशाहीची पायाभरणी, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यावर आधारित प्रेरणादायी व्याख्यान हर्षवर्धन वाघमारे यांनी केले. त्यांच्या व्याख्यानातून संविधानाच्या निर्मितीपासून ते आजच्या बदलत्या काळातील भूमिकेपर्यंत विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर पेदोर यांनी केले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx