Saturday, December 27, 2025
ई-पीकपाणी नोंद ऑफ लाईन पद्धतीने, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीच्या प्रयत्नांना यश
ई-पीकपाणी नोंद ऑफ लाईन पद्धतीने, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीच्या प्रयत्नांना यश...

देश महाराष्ट्र

कोर्लई, : यंदा पडलेल्या परतीच्या पावसामुळे मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भातपीकाचे अतोनात नुकसान झाले असून त्यातच शासनाचे ई-पीकपाणी नोंद करण्यात नेटवर्क मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना ई-पीकपाणी नोंद करण्यात मुदत वाढवून द्यावी किंवा शासन धोरण शिथिल करण्यात यावे.अशी मागणी मुरुड तालुका आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी तर्फे अध्यक्ष ॲड.विनायक शेडगे यांनी आपल्या सहकारी शेतकरी बांधवांसमवेत तहसीलदार आदेश डफळ यांना एका निवेदनाद्वारे करण्यात येऊन वेळप्रसंगी याविरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार.असा इशारा देण्यात आला होता.सदर मागणीची दखल घेऊन शासनाने ई -पीकपाणी नोंद ऑफ लाईन पद्धतीने करण्यात आदेश देण्यात आल्याबद्दल मुरुड तालुका आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी आणि शेतकरी बांधवांच्या वतीने तालुका अध्यक्ष ॲड.विनायक शेडगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तहसीलदार आदेश डफळ यांना एक पत्र देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सचिव, जिल्हाधिकारी -रायगड, तहसीलदार यांचे आभार मानले आहेत.

सन २०२५-२६ या वर्षाची शेतकऱ्यांच्या नावाने ई-पिक पाणी नोंद नसल्याने वर्षभराचे मेहनतीचे नुकसान होणार होते, त्या करीता सरकारने मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावाने पिकपाणी नोंद ७×१२ वर करावी या करीता आंदोलन करण्यात आले होते. सदर अर्जाची महाराष्ट्र शासनाने दखल घेवून सदर शेतक-यांचे पिकपाणी नोंद ऑफ लाईन पद्धतीने करून घ्यावी.असे आदेश पारीत केले,शेतकरी संघटनेच्या संघर्षाला यश आले.त्यामुळे शेतकरी बांधवात आनंदाचे वातावरण आहे.

आजही मुरुड तालुक्यातील शेतकरी ज्या शेत जमिनी पिढ्यान पिढ्या कसतात त्या जमिनिवर कुळ, आहेत, काही जमिनीवर कुळ तर काही जमिनी फक्त शेकडो वर्षापासुन शेतकऱ्यांच्या ताबे कुळात आहेत परंतू ते अजुनही मालक नाहीत.तरी कसत असलेल्या जामीनीची चौकशी करून त्यांना कुळ बनविण्यात यावे व कुळ असलेल्या शेतक‌-यांना मालक बनविण्यात योग्य ते आदेश देण्यात यावेत.अशी विनंती वजा मागणी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीतर्फे करण्यात आली आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx