Sunday, June 1, 2025
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला ४७ मजदूर अडकले
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला ४७ मजदूर अडकले...

देहरादून : उत्तराखंडमधील चमोलीत एक दुर्घटना घडली आहे. माणा गावात हिमकडा तुटल्यानं घडलेल्या दुर्घटनेत ४७ मजूर अडकले आहेत. एकूण ५७ मजूर बर्फाखाली सापडले होते. पण त्यातील १० जणांची सुटका करण्यात आली. अडकलेल्या ४७ मजदूरांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सीमा रस्ते संस्थेची पथकं मजुरांच्या सुटकेसाठी रवाना झाली आहेत. सध्याच्या घडीला इंडो तिबेटियन सीमा पोलीस आणि गढवाल स्काऊटची पथकं मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. 

चमोलीच्या वरच्या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने आजसाठी आधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता.  हिमस्खलनाची भीतीही व्यक्त करण्यात आली. आता बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महामार्गाजवळ हिमकडा कोसळला आहे. उत्तराखंडमधील माना गाव भारत आणि चीनच्या सीमेवर आहे. येथे एक आर्मी बेस कॅम्प आहे. म्हणून, सैन्य प्रथम बचाव कार्यात गुंतलं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके रवाना करण्यात आली आहेत. हिमकडा कोसळल्यामुळे बीआरओ पथकांनी बचावकार्यही सुरू केलं आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी एक्सवर पोस्ट करुन दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. \'जनपद चमोलीतील माणा गावाजवळ बीआरओकडून केल्या जाणाऱ्या बांधकामादरम्यान हिमस्खलन झाल्यानं अनेक मजूर अडकल्याची दुर्दैवी बातमी समजली. आयटीबीपी, बीआरओ आणि अन्य बचाव दलांकडून मदतकार्य केलं जात आहे. सगळे श्रमिक बंधू सुरक्षित राहावेत, यासाठी भगवान बदरी विशाल यांच्याकडे प्रार्थना करतो,\' असं मुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx