अलिबाग : अलिबाग शहरातील प्रसिद्ध मयुर बेकरीच्या मालक, पर्यावरणस्नेही उद्योजिका विद्या वसंत पाटील यांचे गुरुवारी (दि.२०) सकाळी ८.३० वाजता पुणे येथे निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. अल्पशा आजारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती पाटील कुटुंबीयांनी दिली.
विद्या पाटील यांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासून जपला. त्यांनी अलिबागमध्ये मयूर बेकरी या नावाने बेकरीची स्थापना केली. त्या काळात प्लास्टिकचा वाढता वापर ही मोठी समस्या होती. पण विद्या पाटील यांनी सुरुवातीपासूनच प्लास्टिकला पर्याय म्हणून कागद, कपडा आणि नैसर्गिक पॅकिंगचा अवलंब केला. त्यामुळे मयूर बेकरी हा व्यवसायच नव्हे तर समाजातील पर्यावरण-जागृतीचा केंद्रबिंदू बनला. पर्यावरण संवर्धनासह विद्या पाटील यांचा सामाजिक सहभागही मोठा होता. स्थानिक महिला गट, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून त्यांनी वृक्षारोपण, प्लास्टिकविरहित उपक्रम, हरित जनजागृती अशा अनेक मोहिमा राबवल्या.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx