Sunday, June 1, 2025
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला ...

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात मांडलेला अविश्वास ठराव सभापती राम शिंदे यांनी फेटाळला. यामुळे नीलम गोऱ्हे यांना दिलासा मिळाला आहे.


शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार अनिल परब यांनी यावेळी चर्चेची मागणी लावून धरली. मात्र सभापती राम शिंदे यांनी अनिल परब यांची ही मागणी फेटाळली. विधिमंडळ अधिनियम, कायदेशीर बाबी वाचून दाखवल्या. तसेच १४ दिवसापूर्वी ठराव सादर करणे अपेक्षित असते. परंतु कायदेशीर बाबी आणि अधिनियमाच्या कक्षेत बसत नसल्याचे सांगत संबंधित ठराव फेटाळून लावला.


परब यांनी यावर मत मांडताना, ठराव सादर करताना कायदेशीर प्रकिया पूर्ण केली आहे. त्यामुळे १४ दिवसांनंतर तो चर्चेला आणावा. ज्या सदस्यांनी स्वाक्षरी केली आहे, त्यांची मते जाणून घ्यावी, अशी विनंती सभापतींना केली.

मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यावर आक्षेप घेतला. सभापतींनी निर्णय दिल्यानंतर पुन्हा चर्चा करता येत नाही, असे सांगत परब यांना चिमटा काढला. परब त्यामुळे संतप्त झाले. विरोधकांनी त्यानंतर ठरावावर चर्चेची मागणी लावून धरली. मात्र सभापतींनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx