अलिबाग : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौदा वर्षाखालील आंतरजिल्हा दोन दिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा सलामीचा तंत्रसुद्धा फलंदाज आरव बरळ व मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू देव सिंग यांनी दमदार फलंदाजी करत स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शतके झळकावत रायगडच्या संघाला मोठा विजय मिळवून दिला आहे. पुणे येथील सी.पी मैदानावर रायगड विरुद्ध दक्षिण विभागाचा ग्रुप मधील पहिला सामना खेळण्यात आला.त्यामध्ये रायगडच्या संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत एक डाव व १५७ धावाने दक्षिण विभागाच्या संघावार विजय मिळवला आहे.
रायगडच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावत ३३० धावसंख्या उभारली,सलामीवीर फलंदाज आरव बरळ यांनी धुवाधार फलंदाजी करत २१ चौकार व २ षटकार ठोकत १५५ धावा काढल्या तर दुसऱ्या बाजूने मधल्या फळीतील आष्टापल्लू खेळाडू देव सिंग यांनी १६ चौकराच्या साहाय्याने १०२ धावा केल्या.३३० धावसंखेवर रायगडच्या संघाने डाव घोषित केला.प्रतिउत्तर देतांना दक्षिण विभागाच्या संघांचा डाव ११३ धावसंखेवर आटोपला,रायगड कडून अर्शद अली,विराज थोरात, प्रज्वल गोवारी यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. फोल्लो-ऑन घेऊन पुनः फलंदाजीला आलेल्या दक्षिण विभागाचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या ६० ह्या धावसंखेवर गारद झाला,रायगड कडून देव सिंग यांनी सर्वाधिक ५ विराज थोरात यांनी ३ तर अर्शद अली यांनी २ फलंदाजाना तांबूत धाडले. रायगडच्या संघाने स्पर्धेतील पहिला सामना एक डाव व १५७ धावानी जिंकत स्पर्धेला दमदार सुरुवात केली आहे.अष्टपैल्लू खेळाडू देव सिंग याचे प्रशिक्षक सागर कांबळे व आरव बरळ याचे प्रशिक्षक नयन कट्टा व स्वप्नील कदम यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे.संघांनी केलेल्या सुरेख कामगिरीवर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx