म्हसळा : रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे एसटी बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. शॉर्टसर्किटमुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला, ज्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या बसमधून उड्या मारल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सदर बस दिघी-तुरुंबाडी-म्हसळा मार्गे वडाळा येथे जात होती. बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते. प्रवास सुरू असताना अचानक बसच्या कॅबिनमधून धूर निघू लागला. ही घटना पाहताच प्रवाशांनी घाबरून बसमधून उड्या मारल्या. या दुर्घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx