Sunday, June 1, 2025
कंत्राटी कामगारांचे उपोषण
कंत्राटी कामगारांचे उपोषण...

अलिबाग : किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन मिळालेच पाहिजे या मागणीसह इतर मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातील रायगड जिल्ह्यातील खोपोली, कर्जत, उरण नगरपरिषदेच्या १२० कंत्राटी कामगारांनी मंगळवार (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोष सुरू केले आहे. 


खोपोली, कर्जत, उरण नगरपरिषद मधील कंत्राटी कामगारांना अनेक सोयी सुविधांचा अभाव जाणवत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही आश्वासनांचा पलीकडे काहीच हाती लागत नाही. यामुळे कंत्राटी कामगारांच्या मनात संतोष धुमसत असून, आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी खोपोली नगरपरिषदेच्या १०५, कर्जत नगरपरिषद ६२ v उरण नगरपरिषद ४३ कंत्राटी कामगारांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.


कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्या

• किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे.

• कायद्यातील तरतुदीनुसार दरमहा भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणे आवश्यक आहे.

• दैनंदिन कामे करताना आवश्यक गणवेश, रेनकोट, गमबूट यासह इतर साधनसामुग्री मिळावी

• बोनस रक्कम वेळेवर मिळावी

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx