पनवेल : पनवेल जवळलील कर्नाळा येथे रविवारी (दि.४) रात्री अकरा वाजताच्या सुमारास एक खासगी प्रवासी बस उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३५ पेक्षा अधिक प्रवासी बस खाली अडकून गंभीर जखमी झाले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे.
ओमकार ट्रॅव्हल्स नावाची खासगी बस मुंबईहून कोकणात जात होती. पनवेल जवळलील कर्नाळा येथे येताच ही बस उलटल्याने अपघात घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले होते. या अपघातात बस खाली अडकून ३५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले असून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातातील सर्व जखमींना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, अपघात घडल्यानंतर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx