Sunday, June 1, 2025
कर्नाळा स्पोर्टस्‌ने सिंधुरत्न करंडक पटकावला
कर्नाळा स्पोर्टस्‌ने सिंधुरत्न करंडक पटकावला...

अलिबाग : मार्ग सेवाभावी संस्थेतर्फ रायगड जिल्हा कबड्‌डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या, सिंधुरत्न जिल्हास्तरीय महिला कबड्‌डी स्पर्धेत विजेतेपद पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स संघाने पटकावले. अलिबाग वेश्वी येथील ओमकार क्रीडा मंडळ, वेश्वी हा संघ उपविजेता ठरला. पेणच्या ऋतिक्षा क्रीडा मंडळ संघाने तृतीय तर ओम साई क्रीडा मंडळ, कळवे संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. सुवर्णगणेश क्रीडा मंडळ, दिवेआगर संघला शिस्तबद्ध संघ म्हणून गौरविण्यात आले.


चिंतामणराव केळकर विद्यालय चेंढरे-अलिबाग येथे ही स्पर्धा खेळ‌विण्यात आली. कर्नाळा स्पोर्ट्सची ममता चव्हाण हिची सार्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. ओमकार वेश्वी संघाची ईशा पाटील हिला उत्कृष्ट चढाईचे तर ऋतिक्षा पेण संघाची मल्लिका शिंदे हिला उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक देण्यात आले.


कर्नाळा पनवेल आणि ओमकार वेश्वी या दोन संघात झालेला अंतिम समाना अत्यंत चुरशीचा झाला. सुरुवातीला वेश्वी संघ पिछाडीवर होता. वेश्वी संघाने पिछाडी भरून काढली . मध्यांतराला वेश्वी संघ १५-१४ असा एक गुणाने आघाडीवर होता. सामना संपण्यास शेवटची पाच मिनीटे शिल्लक असताना १८-१८ अशी बरोबरी झाली . शेवटची दोन मिनीटे शिल्लक असताना कर्नाळा संघाने वेश्वी संघावर लोण चढवला . येथेच सामना कर्नाळाच्या बाजूने झुकला. कर्नाळाने हा सामना २७-२४ असा जिंकून विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत कर्नाळा संघाने ऋतिक्षा पेण संघाचा १६-१२ असा पराभव केला तर ओमकार वेश्वीने ओमसाई कळवे संघाचे आव्हान २६-११ असे परतवाले.


आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. रायगड कबड्डी लीगचे अध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील , कोकण विभाग पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आंतरराष्ट्रीय प्राशरद कदम, रविंद्र महात्रे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अनंत गोंधळी, आदर्श पंतसस्थेचे संचालक अनंत म्हात्रे, आर सी एफचे जनसंपर्क अधिकारी डॉ. राकेश कावळे. कमळ पतसंस्थेचे संचालक सतीश पाटील, किशोर पुरो, स्पर्धेचे निरीक्षक जनार्दन पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार जगन्नाथ पाटील, माजी जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील, रायगड जिल्हा पोलीस दलाचे माजी क्रीडा प्रमुख विश्वनाथ पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते . ठाकरे गट शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, वेश्वीचे माजी उपसरपंच प्रफुल्ल पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.


भाजपा जिल्हा चिटणीस, अॅड. महेश मोहिते, शेकाप महिला माघाडीच्या अॅड. मानती म्हात्रे, दत्ताजीराव जानपिढकर एज्यूकेशनल ट्रस्टचे अध्यक अमर वार्डे सहयोग पतसंस्थेचे अध्यक योगश मगर, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर आदी मान्यवरांनी स्पर्धेला भेट दिली. विश्वनाथ पाटील यांनी समालोचन केले. प्रतिम सुतार यांनी सूत्रसंचालन केले. मार्ग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी आभारप्रदर्शन केले.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx