Saturday, December 27, 2025
कूच बिहार क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राचा ओडिशा संघावर दणदणीत विजय
कूच बिहार क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राचा ओडिशा संघावर दणदणीत विजय...

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रिलायन्स नागोठणे येथील क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर पार पडलेल्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात ओडिशाच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजी समोर अक्षरशः नांगी टाकली. महाराष्ट्राच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ५२८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ओडिशाचा संघ दोन्ही डावात ढेपाळला. महाराष्ट्राच्या संघाने एक डाव व २५० धावांनी विजय मिळविला.

महाराष्ट्राच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ५२८ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना ओडिशा संघाने पहिल्या डावात सर्व गडी बाद २०० धावसंख्या उभारली. ओडिशाच्या बिश्वजित प्रधान यांनी ४८ स्वागत मिश्रा ४२ पानाकला मोक्षीत यांनी ३७ धावांचे योगदान संघाला दिले. महाराष्ट्राकडून अर्कम सय्यद यांनी सर्वाधिक ५ बळी घेतले तर अभिनंदन अडक यांनी ३ फलंदाजांना ताबूत धाडले.

पहिल्या डावात महाराष्ट्राकडे ३२८ धावांची भक्कम आघाडी होती. ओडिशाचा संघ फॉलो ऑन घेऊन पुन्हा फलंदाजीसाठी उतरला आणि अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. एवघ्या २७.५ षटकात ७८ ह्या धावसंखेवर १० फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होऊन तंबूत जमा झाले. महाराष्ट्राच्या संमकित सुराना यांनी ५ तर हर्षिल सावंत यांनी ४ फलंदाज बाद केले. महाराष्ट्राच्या संघाने सामना एक डाव व २५० धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला असून कूच बिहार स्पर्धेला बोनस पॉईंट सह सुरवात केली.

महाराष्ट्राच्या संघाने उत्तम फलंदाजी व गोलंदाजी केली असल्याने संघाचे प्रशिक्षक इंद्रजीत कामतेकर व संघ व्यवस्थापक राहुल अरवाडे, सिलेक्टर श्रीकांत काटे, शिरीष कामथे यांनी आनंद व्यक्त केला आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सामना यशस्वी रित्या पूर्ण केल्या बद्दल रिलायन्स नागोठणे विभाग व सामना अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx