Saturday, December 27, 2025
कॉग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर युती करण्याचे प्रयत्न सुरू
कॉग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर युती करण्याचे प्रयत्न सुरू ...

ऑनलाईन डेस्क :  निवडणुकीत मनसेबरोबर युती न करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर कॉग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर मुंबईत युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

मविआमध्ये काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गट असे तीन प्रमुख पक्ष आहेत. मतचोरीच्या मुद्यावर मनसेचीही जवळीक वाढली होती. त्यातच उद्धवसेना आणि मनसे एकत्र येणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे हिंदी भाषिकांविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनसेबरोबर युती करणार नाही, अशी भूमिका घेत मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, त्याचवेळी शरद पवार गटाला आपल्याबरोबर घ्यावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्याअनुषंगाने वर्षा गायकवाड यांच्यासह अस्लम शेख, अमीन पटेल, ज्योती गायकवाड यांनी पवार यांची भेट घेतली.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx