Sunday, June 1, 2025
खालापूर तालुक्यातील छम छम विरोधात पोलिसांच्या धडक कारवाई
खालापूर तालुक्यातील छम छम विरोधात पोलिसांच्या धडक कारवाई...

अलिबाग : खालापूर तालुक्यात डान्सबारमध्ये खुलेआम बीभत्स कृत्य सुरू आहेत. डान्सबारमध्ये बारबाला संगीताच्या तालावर अश्लील हावभाव बीभत्स नृत्य करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे समुद्रा बार, स्वागत बार, पुनम बार या तीन बारवर पोलिसांनी छापा टाकीत कारवाई केली. यावेळी बारमध्ये अश्लील हावभाव बीभत्स नृत्य करताना बारबाला आढळून आल्या. तीनही बारवर पोलिसांनी कारवाई करीत ३२ बारबाला इतर ४० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत‌.

खालापूर तालुक्यात डान्सबार खुलेआम सुरू असून तिथे बीभत्स कृत्य सुरू असल्याची माहिती रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार सदर माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना कळविण्यात आली. सोमनाथ घार्गे यांनी तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी २२ पोलीस अंमलदार, महीला अंमलदार तसेच बांगलादेशी पथकाकडील पोलीस अधिकारी महीला पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली या पथकांधि खालापुर तालुक्यातील समुद्रा बार, स्वागत बार हॉटेल पुनम बार अशा एकुण ठिकाणी रवाना करण्यात आले

सदर पथकांनी सदर बारमध्ये जावुन पाहणी केली असता तिंही बारमध्ये बारबाला मद्यप्राशन करत असलेल्या ग्राहकाबरोबर संगिताचे तालावर अश्लील हावभाव बीभत्स नृत्य करताना आढळुन आले. तसेच सदर बारमधील कर्मचारी ग्राहक त्यांना अश्लील हावभाव बीभत्स नृत्य करताना प्रोत्साहित करीत असताना मिळुन आले. त्यामुळे तिन्ही बार विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


* पोलीसांनी समुद्रा बारवर कारवाई करत राहुल नरेश यादव याच्यासह २२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बारबाला, ग्राहक, बारमधील कर्मचारी यांचा समावेश आहे.


* स्वागत बारवर केलेल्या कारवाईत मिरा खातुन सुखचंद शंख यांच्यासह २८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १२ बारबाला, १० ग्राहक, बारमधील कर्मचारी यांचा समावेश आहे.


* पुनम बारवर केलेल्या कारवाईत तोश संजीवा मोगविरा यांच्यासह  २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १२ बारबाला, ग्राहक बारमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx