ऑनलाईन डेस्क : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि गँगस्टर अनमोल बिश्नोई याला बुधवारी (दि.१९) अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानातून उतरताच अनमोल याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले. अनमोलविरोधात विविध राज्यात २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असून, या सर्व प्रकरणात त्याच्यावर कारवाई केली जाईल.
अनमोल बिश्नोईवर अनेक गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यांमध्ये सहभागाचे आरोप आहेत. यामध्ये NCP नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण, सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या फायरिंगमध्ये सहभाग अशा मोठ्या प्रकरणांचा समावेश आहे. अनमोल ऑर्गनाइज्ड क्राइम सिंडिकेट प्रकरणात वाँटेड होता आणि NIA ने त्याच्यावर १० लाखांचा इनामही जाहीर केला होता.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx