Sunday, June 1, 2025
गुजरातमधील फटाके कंपनीत स्फोट
गुजरातमधील फटाके कंपनीत स्फोट...

ऑनलाइन डेस्क : गुजरात राज्यातील बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून, स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्फोट झाला तेव्हा कारखान्यात ३० कामगार काम करत होते. 

बनासकांठातील डीसा भागात असलेल्या फटाका कारखान्यात सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच आसपासचे लोक कारखान्याजवळ पोहोचले. तेव्हा कारखान्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. याची माहिती लगेच एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. डीसा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे कारखान्याचं मोठं नुकसान झालं आहे. भिंती, छप्पर कोसळलं असून ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर स्फोटाच्या तपासाचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx