Sunday, June 1, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडचे आव्हान संपुष्ठात
चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडचे आव्हान संपुष्ठात...

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत बुधवारी अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्ध शेवटच्या षटकात थरारक विजय मिळवला. लाहोरला झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने ८ धावांनी विजय मिळवत सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचं आव्हान संपुष्ठात आलं.

अफगाणिस्तानने इंग्लंडला विजयासाठी ३२६ धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडनेही प्रतिकार करत सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला. मात्र ४९.५ व्या बॉलवर आदील रशीद आऊट झाला आणि इंग्लंडचा डाव हा ३१७ धावांवर आटोपला.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात्र इंग्लंडने ३७ धावांपर्यंत ३ झटके देत अफगाणिस्तानला बॅक फुटवर ढकललं. अफगाणिस्तानने तिथून कमबॅक केलं आणि ५० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून ३२५ धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानला ३०० पार पोहचवण्यात इब्राहीम झाद्रान याने निर्णायक भूमिका बजावली. इब्राहीमने १७७ धावा केल्या. तसेच कर्णधार हशमतुल्लाह शाहीदी आणि मोहम्मद नबी या दोघांनी प्रत्येकी ४० धावा केल्या. तर अझमतुल्लाह ओमरझई याने ४१ धावा जोडल्या.

त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान याच ओमरझई याने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. मोहम्मद नबी याने दोघांना मैदानाबाहेर पाठवलं. तर इतरांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली, ज्यामुळे इंग्लंडला ८ धावांआधी रोखून विजय मिळवता आला.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx