छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन दिवसात या चित्रपटाने १२१ कोटी रूपयांचा पल्ला पार केला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता या चित्रपटाला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाला फायरसीचा फटका बसला आहे. २ तास ३५ मिनिटांचा हा सिनेमा बेकायदेशीर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमाला बॉक्स ऑफिसावर पायरसीमुळे फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
छावा चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट २०२५ या वर्षांतील सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३३.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली असून ती ३९.३० कोटी रूपयांवर पोहोचली. त्यानंतर रविवारी म्हणजेच १६ फेब्रुवारी रोजी या चित्रपटाच्या कमाईत बक्कळ वाढ झाली. चित्रपटाने ४९.०३ कोटी रूपयांचा गल्ला जमावला. पहिल्या तीन दिवसात सिनेमाने जवळपास १२१.४३ कोटी रूपयांची कमाई केली. पण आता पायरसीमुळे प्रेक्षक चित्रपटाकडे पाठ फिरवणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx