Saturday, December 27, 2025
जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाचा अंतिम फेरीत प्रवेश.
जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाचा अंतिम फेरीत प्रवेश....

अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाने पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघावर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीच्या सामन्यासाठी प्रवेश निश्चित केला आहे. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघाने ४० षटकात १० गडी बाद ११९ धावा फलकावर नोंदवल्या, त्यामध्ये कर्णधार देव सिंग यांनी सर्वाधिक ३२ तर शौर्य घरत यांनी ३० धावांचे योगदान संघाला दिले. जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाकडून यश पाटील यांनी ३ हर्षित सिंग स्वराज चौगुले यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. १२० धावांचे लक्ष देऊन फलंदाजीला आलेल्या अलिबागच्या संघ दणदणीत फलंदाजी करत ३५ व्या षटकात अवघे ४ गडी गमावत १२० धावांचे लक्ष पूर्ण केले. जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाचा सलामीवीर तंत्रशुद्ध तडाखेबाज फलंदाज ओम कावळे यांनी नाबाद ८१ धावा काढल्या व आपल्या संघाला सामना एक हाती जिंकून दिले.

अंतिम फेरीत जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाचा सामना रोशन क्रिकेट अकॅडमी कामोठे संघाबरोबर होणार आहे. ज्युनिअर वयोगटात अलिबागचा संघ अनेक वर्षानंतर फायनल मध्ये दाखल झाल्याने अलिबाग तालुक्यातील क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघाचे प्रशिक्षक जगदीश ढगे यांनी विजयाचे सर्व श्रेय आपल्या खेळाडूंनी मैदानावर केलेल्या मेहनतीला दिले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx