अलिबाग : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०२५/२६ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हाभरातील १७ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस दरवर्षी शिक्षक दीन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जिल्ह्यातील १७ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यातील मनोहर पाटील यांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, पेण तालुका किशोर पाटील, पनवेल तालुका योगिनी वैदू, कर्जत संज्योती कांबरी, खालापूर तालुका किर्ती धारणे, उरण तालुका अजित जोशी, सुधागड तालुका वृषाली गुरव, रोहा तालुका प्रसाद साळवी, महाड तालुका वसंत साळुंखे, श्रीवर्धन तालुका सीमा चव्हाण व नारायण खोपटकर, म्हसळा तालुका शशीकांत भिंगारदेव, पोलादपूर तालुका विजय पवार, माणगाव सुजाता मालोरे व परेश अंधेरे, तळा तालुका उल्का मोडकर, मुरुड तालुका हेमकांत गोयजी यांना जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx