Sunday, June 1, 2025
जिल्हा परिषद गैरव्यवहार उच्च न्यायालयातून आरोपीच्या वकिलांनी जमीन अर्ज घेतला मागे
जिल्हा परिषद गैरव्यवहार उच्च न्यायालयातून आरोपीच्या वकिलांनी जमीन अर्ज घेतला मागे...

अलिबाग : कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून अलिबाग बालविकास सेवा योजना, रायगड जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७२ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भ्रष्टाचारातील आरोपी महेश मांडवकर याच्या वकिलांनी मुंबई उच्च मांडवकर याचा अटकपूर्व जमीन अर्ज मागे घेतला आहे. मांडवकर याला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याने वकिलांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


अलिबाग बालविकास सेवा योजना, रायगड जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७२ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे यांच्यासह कनिष्ठ सहाय्यक ज्योतीराम वरोडे, कनिष्ठ सहाय्यक महेश मांडवकर यांच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात २३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नाना कोरडे याची चौकशी करण्यात आली असून, नाना‌ कोरडे सध्या जामीनावर बाहेर आहे.


मात्र कनिष्ठ सहाय्यक ज्योतीराम वरोडे, कनिष्ठ सहाय्यक महेश मांडवकर हे दोन आरोपी मागील दिड महिन्यांपासून फरार आहेत. या दोन्ही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने यापूर्वी फेटाळले आहेत. यानंतर महेश मांडवकर याने आपल्या वकिलांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने मांडवकर याला दिलासा देण्यास नकार दिल्याने त्याच्या वकिलांनी आपला अर्ज मागे घेतलं आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx